Pune – अंमली पदार्थ विकणारा नायजेरियन तरुण पोलिसांच्या ताब्यात

लाखोंचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – विक्रीसाठी आणलेले 1 लाख 28 हजारांचे अंमली पदार्थ जप्त करत पोलिसांनी एका नायजेरियन तरुणाला ताब्यात घेतले आहे.ही कारवाई बंडगार्डन पोलिसांनी आज सोमवारी (दि.3) आरटीओ चौकात केली आहे.

ओलामिलेकन सुलेमा फ्रीडम(वय 33, रा. मूळ नायजेरिया) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल पोलिसांना त्यांच्या बातमीदाराकडून एक नायजेरियन तरुण कोकेन या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी संध्याकाळी आरटीओ चौकात येणार असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे पोलिसांनी आरटीओ चौकात सापळा रचला. त्यानंतर त्यांना वर्णनात सांगितल्याप्रमाणे एक नायजेरियन तरुण चहाच्या टपरी समोर मिळाला.पोलिसांनी त्याला जागीच पकडून त्याची अंगझडती घेतली तेव्हा त्याच्याजवळ 1 लाख 28 हजार रुपये किमतीचे कोकेन आणि क्रिस्टेल मेथ मिळाले.
पोलिसांनी त्याच्याजवळील अंमली पदार्थ जप्त केले असून पुढील तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.