Pune : महाराष्ट्राची भूमिकन्या म्हणून उपसभापतीपदी विराजमान होण्याचा पहिला मान- डॉ. नीलम गोऱ्हे

मपीसी न्यूज- विधानपरिषदेच्या इतिहासात तब्बल 60 वर्षानंतर एका महिला आमदाराला राज्य विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहातील उपसभापतीपद मिळाले आहे. महाराष्ट्राची भूमिकन्या म्हणून या पदांवर विराजमान होण्याचा पहिला मान आपल्याला मिळाला असल्याचे विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी शिवसेना आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी शिवसेना आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांची नुकतीच निवड झाली आहे. या निमित्त त्यांनी पत्रकारांची संवाद साधला. तत्पूर्वी गोर्‍हे यांनी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे दर्शन घेतले. त्यानंतर शिवसेना भवन येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

गोऱ्हे म्हणाल्या, “महिला संरक्षण आणि सक्षमीकरणचे काम करताना सामाजिक प्रश्नांना न्याय देण्याचे काम केले आहे. यापुढे समाजातील अनेक प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी सामाजिक भूमिकेतून काम करताना उपसभापतीपदीचा उपयोग करणार आहे. मराठा आरक्षणा संदर्भातील न्यालयाने दिलेल्या निर्णयाबाबत राज्य सरकार योग्य मार्ग काढेल” प्रत्येक समाजाला न्याय देण्याचे काम युती सरकार करत असल्याचे त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप मधील समन्यवयामुळे यश मिळाले असल्याचे गोऱ्हे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.