Pune : एका रात्रीत नऊ दुकाने फोडली, औंध परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ

Nine shops were broke down in one night, burglary in Aundh area

एमपीसी न्यूज – औंध परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून परिहार चौक जवळील नऊ दुकाने चोरट्यांनी एका रात्रीत फोडल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी एका किराणा विक्रीच्या दुकानातील गल्ल्यात ठेवलेली 27,500 रुपयांची रोकड आणि माल असा जवळपास 54,500 रुपयांचा मुद्देमाल पळवला आहे.

दरम्यान, रमेश चौधरी यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंधमधील परिहार चौकात चौधरी यांचे रमेश किराणा मालाचे मिनी मार्केट आहे.

चोरट्यांनी मध्यरात्री चौधरी यांच्या दुकानाचा दरवाजा उचकटून गल्लयातील 27 हजार रूपयांची रोकड तसेच काही माल चोरून नेला. या परिसरातील गो कलर्स, सनशाईन होजिअरी, एलेन सोली, शूज एक्सप्रेस, पूनम कलेक्शन, एशियन पेंट्स, बास्किन रॉबिन्स, गोकुळ स्वीटस या दुकानांचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी माल लांबविला आहे.

सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर व्यापाऱ्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही चित्रीकरणात दोन चोरटे दुचाकीवरून परिहार चौकात आल्याचे उघडकीस आले आहे.

चोरट्यांनी रेनकोट, टोपी, हातमोजे तसेच मास्क परिधान केल्याचे चित्रीकरणात आढळून आले आहे. परिहार चौक तसेच दुकानांच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस उपनिरीक्षक एमए. जाधव पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.