Pune : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदासाठी रणजित शिवतारे

एमपीसी न्यूज- पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे खेडच्या निर्मला पानसरे यांचे तर उपाध्यक्षपदी भोरचे रणजित शिवतारे यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी त्यांच्या नावांची घोषणा केली.

_MPC_DIR_MPU_II

राष्ट्रवादी काँग्रेसकडे बहुमत असल्याने अध्यक्ष, उपाध्यक्ष राष्ट्रवादीचेच होणार हे निश्चित होते. यावेळी अध्यक्षपद सर्वसाधारण महिला राखीव असल्याने 18 महिला सदस्या इच्छुक होत्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. आरक्षण जाहीर झाल्यापासून अध्यक्ष पदासाठी इच्छूक असलेल्या महिला सदस्यांनी पक्षश्रेष्ठींजवळ आपली बाजू मांडली होती.

अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदानंतर आता इतर विषय समितींच्या सभापतींच्या निवडी केल्या जाणार असून बांधकाम समितीचे सभापती पद मिळवण्यासाठी आता सदस्यांमध्ये चढाओढ लागली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.