Pune : लिंबू – मिर्ची लावण्यात गैर काय?- निर्मला सीतारामन

एमपीसी न्यूज – राफेलच्या चाकाखाली लिंबू ठेवून पूजा केली तर त्यात गैर काय असे स्पष्टीकरण केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी फ्रान्समध्ये राफेलच्या चाकाखाली लिंबू ठेवून पूजा केली. त्यासंदर्भात पुण्यात पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, ही भारतीय परंपरा आहे. अशी पूजा करण्यात गैर काय ? मग पंतप्रधान मोदी ‘हम चाँद पे जा रहे है, और कही लोक लिंबू मिर्ची पे अटके हैं’, असे म्हणतात, त्यावर खुलासा करताना त्या म्हणाल्या, “याचा अर्थ आम्ही विज्ञान सोडला असा नाही. मी सुद्धा देवी पूजन करते. विजयादशमीचा दिवशी शस्त्रपूज करणे ही आमची परंपरा आहे. त्यातून अंधविश्वास पसरविणे हा हेतू नाही.

सध्या ऑटोमोबाइल क्षेत्रामध्ये आलेल्या मंदीबाबत सीतारामन यांनी सांगितले की, आम्ही देशभरातील ऑटोमोबाइल उद्योजकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. नवी दिल्ली येथे या उद्योजकांनी माझी भेट घेतली. सध्या वाहन खरेदीच्या मागणीमध्ये वाढ झालेली नसून याबाबत उद्योजकांच्या काही मागण्या असल्यास त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन सीतारामन यांनी केले.

पंजाब महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेसारखा घोटाळा यापुढे होऊ नये, यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात कायदा करण्यात येणार असल्याचेही निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला खासदार गिरीश बापट भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.