Pune : ‘निसर्ग’चा राजगडालाही तडाखा; गडावरील देवीच्या मंदिराचे छप्पर उडाले

nisarga' strikes Rajgad too; The roof of the temple of the goddess on the fort was blown off

एमपीसीन्यूज : बुधवारी, दुपारनंतर आलेल्या निसर्ग वादळामुळे स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगडालाही तडाखा दिला. या वादळात गडावरील पद्मावती देवीच्या मंदिराचे छप्पर उडून गेले. तसेच गडावरील वीजपुरवठाही खंडित झाला.

या वादळात गडाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. आज शनिवारी शिवराज्याभिषेक असल्याने अनेक शिवभक्त राजगडावर गेले होते. त्यावेळी गडावरील पद्मावती देवीच्या मंदिराचे छप्पर उडून गेल्याचे त्यांना दिसले.

तसेच वीजपुरवठाही खंडित झाल्याचे त्यांच्या निर्दशनास आले. या वादळात मंदिराचे मोठे नुकसान झाल्याची माहिती शिवप्रेमींनी दिली.

राजगडावरील मंदिराची अवस्था पाहून शिवप्रेमींकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. त्याचबरोबर लवकरात लवकर पद्मावती देवीच्या मंदिरावरील छप्पर बसवण्याची मागणी शिवप्रेमींकडून करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.