Pune : कुणाला मुख्यमंत्री बनवणे हे नाही, तर राष्ट्रनिर्माण हे आपले ध्येय- नितीन गडकरी

एमपीसी न्यूज- कुणाला पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री बनवणे हे नाही तर राष्ट्रनिर्माण हे आपले ध्येय आहे असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. पुण्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते सदाशिव देवधर यांच्या ‘सानंद सकुशल’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाला नितीन गडकरी यांची उपस्थिती होती. त्याच कार्यक्रमात राष्ट्र निर्माण हे आपले उद्दीष्ट असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी नितीन गडकरी यांनी भारतीय विचार साधना प्रकाशित ‘माणूस नावाचं काम’ या पुस्तकाचेही प्रकाशन नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे, प्रा. मिलिंद मराठे, अरुण करमरकर उपस्थित होते.

यावेळी नितीन गडकरी म्हणाले, ” देशाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी स्वच्छ आणि जबाबदार कार्यकर्ते असणे महत्वपूर्ण आहे. जीवनमूल्ये समाजात महत्वाची आहेत. त्याचप्रमाणे छोट्या छोट्या संस्कारातून माणूस घडत असतो आणि त्यानंतर समाज चांगला बनतो. याच समाजातील हजारो कार्यकर्त्यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम केले आहे. त्यामुळे आज आम्ही शिखरावर काम करत आहोत. पैसे, सत्ता मिळेल. पण निस्वार्थी काम करणारा कार्यकर्ता मिळू शकणार नाही” असेही गडकरींनी म्हटले आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.