सोमवार, डिसेंबर 5, 2022

Pune : अरविंद व्यं. गोखले व वासुदेव कुलकर्णी लिखित ‘ड्रॅगनचे करोनास्त्र’ पुस्तकाचे मंगळवारी प्रकाशन

एमपीसीन्यूज : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर यांच्या हस्ते ‘ड्रॅगनचे करोनास्त्र’ या कोरोनाबाबतच्या पहिल्या-वहिल्या मराठी पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी (दि. 16) होणार आहे.

पुणे विद्यापीठात दुपारी 12.30 वाजता हा प्रकाशन सोहळा होणार आहे. श्री गंधर्व-वेद प्रकाशित हे पुस्तक ज्येष्ठ पत्रकार अरविंद व्यं. गोखले आणि वासुदेव कुलकर्णी यांनी लिहिले आहे.

सध्याच्या घडीला संपूर्ण जगाला करोनाचा विळखा पडला असून भारतही त्यातून सुटलेला नाही. चीनमधील वुहानमध्ये हा विषाणू सापातून आला की वटवाघळातून आला या विषयी चर्चा होत राहिली आणि चीनने आपल्याकडे वटवाघूळ यांचे मांस खालले जात नाही, असा खुलासा केला.

अशा अनेक बाबींचा उहापोह या पुस्तकात असणार आहे.

Latest news
Related news