Pune : निझामी ब्रदर्सच्या कव्वाली कार्यक्रम ‘ शाम ए सुफीयाँ’ला उस्फूर्त प्रतिसाद

'डेक्कन लिटरेचर फेस्टीव्हल'चा समारोप

एमपीसी न्यूज- ‘दकनी अदब फाउंडेशन’ आयोजित ‘डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हल ‘मध्ये ‘निझामी ब्रदर्स’ च्या कव्वाली कार्यक्रम ‘ शाम ए सुफीयाँ ‘ ला, फेस्टिव्हलच्या तिसऱ्या अंतीम दिवशी शेवटच्या सत्राला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

निझामी ब्रदर्सनी सुफी संगीत, कव्वालीचे, शेरेशायरीचे अनोखे अंदाज पेश केले, आणि फेस्टिव्हलचा शेवट गोड, संस्मरणीय केला. हिंदू मुस्लिम एकतेची दास्तान सांगत,’मन मे कुराण रखेंगे, हात मे गीता रखेंगे’ असा शायराना अंदाज त्यांनी बयां केला. ‘अल्ला हो’ कव्वलीला जोरदार प्रतिसाद मिळाला. दिल्लीच्या ख्वाजा निजामुद्दीन सुफी दर्ग्याकडून आलेली भेट संयोजक मोनिका सिंग, जयराम कुलकर्णी, मनोज ठाकूर यांना देण्यात आली.

संयोजक मोनिका सिंग यांनी कलाकारांचा सत्कार केला. रसिक पुणेकरांनी जोरदार दाद दिली. संयोजक जयराम कुलकर्णी, मनोज ठाकूर, तसेच युवराज शहा असे मान्यवर सत्कारप्रसंगी उपस्थित होते.

तत्पूर्वी ‘पारंपारिकतेकडून आधुनिकतेकडे जाणारा स्त्रीचा प्रवास ‘ गुडाम्बा ‘ नाटकातून लुबना सलीम यांनी पेश केला. जावेद सिद्दीकी लिखित हे नाटक सलीम आरिफ यांनी दिग्दर्शित केले होते. या महोत्सवात ४0 हून अधिक लेखक, वादक, कलाकार, पटकथा लेखक, संवाद लेखक, कवी, अभिनेते, नाटककारांनी कलाकारांनी, एकपात्री कलाकारांनी सादरीकरण केले. या महोत्सवाचे हे दुसरे वर्ष होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.