Pune : स्थलांतरासाठी जबरदस्ती करण्यात येणार नाही : शेखर गायकवाड

नागरिकांनी स्वतःहून महापालिकेच्या शाळेत राहण्यासाठी जावे

एमपीसी न्यूज – कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने पुणे महापालिका शिक्षण मंडळाच्या वतीने शहरातील दाट लोकवस्ती व झोपडपट्टी परिसरातील नागरिकांना नजीकच्या मनपा शाळेत तात्पुरत्या स्वरूपात दिवस- रात्र राहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 340 शाळांमध्ये ही सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्या ठिकाणी लोकांनी स्वतःहून राहायला यावे, स्थलांतरासाठी आम्ही कोणतीही जबरदस्ती करणार नसल्याची माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी ‘एमपीसी न्यूज’ शी बोलताना दिली.

कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंधात्मक उपाय योजनेअंतर्गत पुणे महापालिका शाळेत शहरातील दाट लोकवस्ती व शहरातील झोपडपट्टी परिसरात कोरोना विषाणू प्रादुर्भावावर नियंत्रण राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. परिसरातील निवासाच्या अडचणी, घरात कुटुंब सदस्य संख्या अधिक असल्याने येणाऱ्या सोशल डिस्टंसिंगच्या अडचणी, अशातच घरातील व्यक्तीला कोरोना लक्षणे, संशयित, अथवा ते बाधित रुग्ण होण्याची शक्यता आहे.

या मुळे खबरदारीचा उपाय म्हणून विलगिकरणाच्या सुविधेकरिता, रुग्णनाच्या उपचारार्थ कुटुंबातील इतरांना संसर्ग होऊ नये याकरिता व एकूणच सुरक्षा व अशा परिसरातील नागरिकांची स्वतंत्ररित्या व तात्पुरत्या स्वरूपाच्या निवासस्थानाची व्यवस्था करणे निकडीचे आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी मनपाच्या संबंधित विभागांना आदेश दिले होते. मात्र, नागरिक या शाळांमध्ये राहायला यायला तयार नाहीत.

महापालिकेच्या शाळांत केवळ राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. जेवणाची आणि अंथरुणाची सोय लोकांनीच करायची आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. झोपडपट्ट्यामध्ये एका – एका घरात 5 ते 6 व्यक्ती वास्तव्यास आहेत. त्यांच्यामध्ये सोशल डिस्टनसिंग राहावे, कोरोनाला आळा बसावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या मध्ये स्तलांतरासाठी कुणावरही जबरदस्ती करणार नसल्यचे महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.