Pune : पुण्यात 23 जुलैनंतर लॉकडाऊन नाही : जिल्हाधिकारी

No lockdown in Pune after July 23: Collector : पुणे शहरात कोरोना रुग्ण संख्या नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

एमपीसी न्यूज – येत्या 23 जुलै नंतर पुण्यात लॉकडाऊन नाही, अशी महत्वपूर्ण माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली. मात्र, रविवारच्या दिवशी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्यामुळे यापुढील काळात या दिवशी नागरिकांची गर्दी कमी करण्यावर विचार सुरू असल्याचे सूतोवाच ही त्यांनी केले.

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता 23 जुलै पर्यंत 10 दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. या काळात नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला चांगले सहकार्य केले. त्यामुळे या लॉकडाउननंतर पुन्हा लॉकडाउन असणार नाही, असेही त्यांनी निक्षून सांगितले.

_MPC_DIR_MPU_II

पुणे शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यापासून प्रशासनाकडून रुग्ण संख्या नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या कालावधीत तपासण्याही वाढविण्यात आल्या आहेत.

त्यामुळे रुग्णांची संख्या वाढती आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असले, तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये. पुढे येऊन उपचार घ्यावेत. कोणत्याही रुग्णाला बेड कमी पडू देणार नाही.

सध्याची परिस्थिती लक्षात घेता, शहरी भाग आणि त्यानंतर ग्रामीण भागातील रुग्णाची संख्या नियंत्रणात येण्यास मदत होईल, असा विश्वासही जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1