Pune : वाहतूक पोलिसांना दाखवण्यासाठी कागदपत्रांची ई-कॉपी पुरेशी ; केंद्र सरकारचा निर्णय

1,382

एमपीसी न्यूज- वाहतुकीचे नियम मोडल्यास वाहतूक पोलिसांकडे ड्रायव्हिंग लायसेन्स किंवा गाडीची मूळ कागदपत्रे सोपवण्याची किंवा दाखवण्याची आता गरज नाही. केंद्र सरकारने राज्यांतील वाहतूक विभागाला याबाबतचा आदेश जारी केला आहे.

HB_POST_INPOST_R_A

तुमच्या मोबाइलमध्ये असणारी कागदपत्रांची ई-कॉपी वाहतूक पोलिसांना दाखवण्यासाठी पुरेशी आहे. केंद्राच्या आदेशात म्हटले आहे की, ड्रायव्हिंग लायसन्स, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि इन्शुरन्स पेपरसारख्या कागदपत्रांची मूळ प्रत तपासणीसाठी घेतली जाऊ नये. डिजीलॉकर (DigiLocker) किंवा एमपरिवहन (mParivahan) अॅपमध्ये असणारी कागदपत्रांची ई-कॉपी दाखवली तरी चालणार आहे. वाहतूक पोलीस आपल्याकडील मोबाइलवरुन क्यूआर कोड स्कॅन करत चालक किंवा वाहनाची संपूर्ण माहिती डेटाबेसवरुन मिळवू शकतात.

.

HB_POST_END_FTR-A1
%d bloggers like this: