Pune : कॅंटोन्मेंट हद्दीमधील घरांच्या किरकोळ दुरुस्तीसाठी परवानगीची गरज नाही

एमपीसी न्यूज- कॅंटोन्मेंट हद्दीमधील घरांच्या किरकोळ दुरुस्तीसाठी आता परवानगीची गरज लागणार नाही. याबाबत संरक्षण मंत्रालयाने रक्षा संपदा विभागाला आदेश दिले आहेत. मात्र मात्र देहूरोड कॅंटोन्मेंट हद्दीमधील 90 टक्के भाग हा रेडझोन बाधित असल्याने येथील घरांच्या दुरुस्तीबाबत आदेशात स्पष्ट सूचना दिलेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

संरक्षण मंत्रालयातील उपसंचालक राजेश कुमार यांनी मागील मंगळवारी (दि. 10) रक्षा संपदा विभागाला पात्र पाठवले असून या पत्रामध्ये कॅंटोन्मेंट हद्दीमधील घरांच्या किरकोळ दुरुस्तीसाठी आता परवानगीची गरज लागणार नाही असे नमूद केले आहे.

या पत्रामधील सूचनेनुसार घरांच्या अंतर्गत भिंती दुरुस्त करणे, जिने दुरुस्त करणे, भिंतीच्या कोसळलेल्या भागाची दुरुस्ती करणे, सीमा भिंत दुरुस्ती, जुन्या मोजमापात बदल न करता घराच्या छताची दुरुस्ती, रंगकाम, सोलर यंत्रणा बसवणे, वातानुकूलन यंत्रणा बसवणे, प्रकाश व्यवस्था करणे, सजावट करणे, घराच्या खिडक्या, दरवाजे बदलणे पाण्याची टाकी बसवणे इत्यादी कामांसाठी आता कॅंटोन्मेंट बोर्डाची परवानगी घेण्याची गरज भासणार नाही. मात्र जुन्या घरांचा पुनर्विकास करण्यासाठी कॅंटोन्मेंट कायद्यामधील तरतुदीनुसार रीतसर परवानगी घ्यावी लागणार आहे.

दरम्यान, देहूरोड कॅंटोन्मेंट हद्दीमधील 90 टक्के भाग हा रेडझोन बाधित असल्याने येथील घरांच्या दुरुस्तीबाबत आदेशात स्पष्ट सूचना दिलेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.