Pune: शहरात ४८ तासांत कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही!

0

एमपीसी न्यूज – पुणे शहरात ४८ तासांत कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. शहरात यापूर्वी आढळलेले कोरोनाबाधित रुग्ण उपचारांनंतर बरे होऊ लागले आहेत, ही आणखी दिलासादायक गोष्ट आहे, असेही ते म्हणाले.

पुणे महालिकेच्या हद्दीत गेल्या ४८ तासांत एकही कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही. तसेच डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या सर्व कोरोनाग्रस्तांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती महापौरांनी दिली.

नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले नाहीत तसेच उपचार घेत असलेले रुग्ण बरे होऊ लागले असले तरी कोरोना संपल्याचा भ्रमात कोणीही राहू नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार घरीच थांबा, आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, गर्दी टाळा, असे आवाहनही महापौर मोहोळ यांनी केले आहे.

HB_POST_END_FTR-A2
You might also like