Pune News : पुणे शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा राहणार गुरुवारी बंद

एमपीसी न्यूज : जलवाहिनीची दुरुस्ती करण्यासाठी महापालिकेनं पाणीब्लॉक घेतल्यानंतर आता पुण्यातील अनेक भागांमध्ये येत्या गुरुवारी (24 मार्च) पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे आता आधीच पाणीटंचाईचा सामना करत असलेल्या पुणेकरांना पाणी जपून वापरावं लागणार आहे.(Pune News) चिखली जलशुद्धीकरण केंद्रामध्ये फ्लो मीटर बसवण्यासाठी, पर्वती-एसएनडीटी मार्गावरील जलवाहिनीची गळती रोखण्यासाठी आणि चतु:श्रृंगी येथील पाण्याच्या टाकीला मुख्य जलवाहिनीला जोडण्यासाठी पालिकेनं येत्या गुरुवारी शहरातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी दुपारनंतर कमी दाबानं पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

 

 

कोणत्या भागांमध्ये पाणीपुरवठा बंद असेल?

सकाळ नगर, अनगळ पार्क, राजभवन, चतु:श्रृंगी, बोपखेल, म्हस्के वस्ती, आळंदी रस्ता, टिंगरेनगर, आदर्श कॉलनी, बर्माशेल झोपडपट्टी, औंध, बोपोडी, औंध रस्ता, अभिमानश्री सोसायटी, विधाते वस्ती, आयटीआय रस्ता, पंचवटी, पुणे विमानतळ, लोहगांव, राजीव गांधी नगर, विमाननगर, यमुनानगर, श्रीपार्क सोसायटी, दिनकर पठारे वस्ती, कस्तुरबा वसाहत, सिद्धार्थनगर, औंध गाव, पुणे विद्यापीठ परिसर, भाऊ पाटील रस्ता, बाणेर रस्ता परिसर, भोईटे वस्ती, सिंध सोसायटी, सानेवाडी, आनंद पार्क, आयसीएस कॉलनी भोसले नगर, इंदिरा वसाहत, ठुबे पठारे नगर, खराडी बाह्यवळण रस्ता या भागांतील पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे.

 

MHADA : ‘म्हाडा’ ने घरांच्या उपलब्धतेसाठी प्रकल्पांना गती द्यावी – उपमुख्यमंत्री

 

 

काही दिवसांपूर्वी सिंहगड रोडवरील जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी पालिकेनं शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा तब्बल 48 तासांसाठी बंद केला होता(Pune News). त्यामुळं पुणेकरांची मोठी पंचाईत झाली होती. त्यानंतर आता पुन्हा पुण्यातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार असल्यामुळं पुणेकरांची मोठी अडचण होणार आहे

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.