BNR-HDR-TOP-Mobile

Pune : पोलिसांची ‘एनओसी’ठरतेय विकासकामांत अडथळा -हेमंत रासने

0

एमपीसी न्यूज – पुणे शहरात विविध विकासकामे सुरू आहेत. ही विकासकामे करताना पोलिसांची एनओसी अडथळा ठरत असल्याचे वास्तव स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी मंगळवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत मांडले. मुळात विकासकामे करताना पोलिसांची एनओसी (NOC) आवश्यक आहे का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

महापालिका आयुक्त सौरभ राव पुणे शहर पोलिस आयुक्तांशी या विषयावर चर्चा करणार आहेत. ज्या ठिकाणी विकासकामे करताना वाहतुकीला अडथळा ठरते, त्या ठिकाणी एनओसी आवश्यक आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.

एका ठेकेदार आणि अभियंत्यावर पोलिसांतर्फे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याची महापालिका प्रशासनातर्फे दाखल घेण्यात आली आहे.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement