Pune : पुणे न्यायालयाच्या भिंतीवर #NoMandirNoVote चे पोस्टर्स

एमपीसी न्यूज- राम मंदिराचा मुद्दा देशात चांगलाच गाजतो आहे. अशातच पुणे न्यायालयाच्या भिंतीवर #NoMandirNoVote असा हॅशटॅग तयार करून 2019 च्या आधी मंदिर निर्मितीचा कायदा आणा नाहीतर मतं विसरा अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून पोस्टर्स लावण्यात आली आहेत. या पोस्टर्सने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.

भाजपाने राम मंदिराचा प्रश्न धार्मिक भावनेचा करत आत्तापर्यंत मते मिळवली आहेत. तर आता 2019 मध्येही हाच मुद्दा चर्चेला येत आहे. याप्रकरणी कोर्टाच्या निर्णयाची वाट न बघता अध्यादेश काढा अशी मागणी साधूसंतांकडून आणि शिवसेनेकडूनही होते आहे. मात्र अध्यादेश काढण्यासंबंधी सरकारने अद्याप कोणतीही चर्चा सुरु केलेली नाही किंवा त्यासंबंधी कोणतीही पावलंही उचललेली नाहीत.

राम मंदिराचा प्रश्न पुढे करून मते मागायची ही भाजपाची जुनी खेळी आहे. मात्र आता मतदारांनी ‘मंदिर नाही तर मत नाही’ अशीच भूमिका घेतली आहे. त्यामुळे राम मंदिर प्रश्नाचे काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like