Pune : संस्कारक्षम वह्यांचे गुरुवारी विनामूल्य वाटप

म्हाळूपार्वती प्रतिष्ठान,आराध्या फौंडेशन यांचा उपक्रम

एमपीसी न्यूज- म्हाळूपार्वती प्रतिष्ठान व आराध्या फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे महानगरपालिकेच्या आठवी, नववी, दहावी गरजू व होतकरू मुलांना संस्कारक्षम वह्यांच्या मोफत वाटपाचा कार्यक्रम गुरुवारी (दि. 27) करण्यात येणार आहे.

उद्योजक रोहन गजेंद्र पवार (पिनॅकल ग्रुप) यांच्या हस्ते वह्यांच्या मुखपृष्ठाचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी निलेश निकम, प्रकाश निकम, पूनम शैलेश हेंद्रे, विलास निकम, बबन निकम, अरुण औचरे, विशाल सूर्वे, बाळासाहेब हेंद्रे, शैलेश हेंद्रे,अतुल जोशी, डॉ.संजय जोशी, श्रद्धा जोशी उपस्थित होते.

जनवाडी, गोखलेनगर, वडारवाडी, वाकडेवाडी, औंध, बाणेर परिसरातील मनपा शाळांमध्ये सुविचार संदेश असलेल्या या संस्कारक्षम मुखपृष्ठांच्या वह्या वाटल्या जाणार आहेत ,असे निलेश निकम यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.