Pune : वाहतूक नियमाचा भंग करणाऱ्या वाहनचालकांना आता रोखीने भरता येणार दंड

पुणे शहर वाहतूक पोलिसांची माहिती

एमपीसी न्यूज – ई-चलनाची कारवाई झालेल्या आणि वाहतूक नियमाचा भंग करणाऱ्या वाहनचालकांना आता रोखीने दंड रक्कम भरता येणार आहे. यासाठी पुणे शहर वाहतूक पोलिसांनी पुणे उपायुक्त वाहतूक शाखा पुणे यांच्या नावाने सुरु असलेले एसबीआय बँकेतील खाते (खाते क्रमांक 36819845841) सुविधा उपलब्ध केली आहे. 

_MPC_DIR_MPU_II

ज्या वाहनचालकांवर ई- चलनाची कारवाई झाली आहे. तसेच काहींकडे डेबीड कार्ड अथवा क्रेडिट कार्ड नसणाऱ्या आणि ज्यांना याबाबत पुरेशी माहिती नसणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक नियमाचा भंग केल्याची कारवाई झाल्याबाबतची तडजोड रक्कम रोख स्वरूपात भरणा करण्याची सुविधा पुणे शहर वाहतूक पोलिसांनी उपलब्ध करून दिली आहे.

  • यासाठी त्यांनी पुणे उपायुक्त वाहतूक शाखा पुणे यांच्या नावाने सुरु असलेले एसबीआय बँकेतील खाते (खाते क्रमांक 36819845841) यामध्ये दंडात्मक रक्कम भरून त्याची पावती वाहतूक नियंत्रण कक्ष येथे जमा करून दंड कारवाई पूर्ण करणे अनिवार्य आहे. तसेच ज्यांनी हि प्रक्रिया पूर्ण करून पुणे उपायुक्त वाहतूक शाखा पुणे येथील रोखपाल यांनाही कळविणे आवश्यक आहे. तरच हि प्रक्रिया पूर्ण झाली असे समजून घेण्यात येईल, असे पुणे शहर वाहतूक पोलिसांनी कळविले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.