Pune : आता शहर सोडून गावी जाणाऱ्यावर गुन्हा दाखल करणार -संदीप पाटील

एमपीसी न्यूज – मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि कल्याणमधून गावाकडं जाणाऱ्यावर थेट गुन्हा दाखल होणार आहे. एवढंच नाही तर या नागरिकांना आहे तिथेच रस्त्यावर थांबाव राहावं लागणार आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी थेट कारवाईचा इशारा दिला आहे.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आहे. जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, अशाही परिस्थितीत अनेकजण सर्रासपणे प्रवास करत आहे. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली.

मुंबई, नवी मुंबईतून, ठाणे आणि कल्याण मधून अनेकजण गावाकडे जात आहेत. सांगली, सातारा आणि कोल्हापूरकडे जात आहेत. खासगी वाहन आणि इतर वाहनातून ते प्रवास करताना आढळून आलेत. त्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याचबरोबर एक्सप्रेस आणि पुणे ग्रामीणच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अशा नागरिकांना आहे तिथंच रस्त्यावर थांबावं लागणार आहे, असं पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.