Pune : कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 881; भवानी पेठ बनली हॉटस्पॉट

एमपीसी न्यूज – भवानी पेठ, कसबा – विश्रामबागवाडा, ढोले पाटील रोड, येरवडा – कळस – धानोरी, शिवजीनागर – घोले रोड परिसरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतेच आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे भवानी पेठ हा कोरोनाचा हॉटस्पॉट झाला आहे, तर पुणे शहर आणि बाहेरील मिळून पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 881 इतका झाला आहे, अशी माहिती पुणे स्मार्ट सिटीतर्फे देण्यात आली आहे.

भवानी पेठ भागात 187, ढोले पाटील रोड 122, कसबा – विश्रामबागवाडा 114, येरवडा – कळस – धानोरी 101, शिवाजीनगर – घोले रोड 90, धनकवडी – सहकारनगर 45, वानवडी – रामटेकडी 43, हडपसर – मुंढवा 28, बिबवेवाडी 26, नगररोड – वडगावशेरी 21, कोंढवा – येवलेवाडी 12, सिंहगड रोड 10, वारजे – कर्वेनगर 9, औंध – बाणेर 3, कोथरूड – बावधन 1, पुणे शहर बाहेरील 41 असे पुण्यात 881 कोरोनाचे रुग्ण आहेत, अशी माहिती पुणे स्मार्ट सिटीतर्फे देण्यात आली आहे.

कोरोनाचे रुग्ण कमी व्हावे यासाठी कडक उपाययोजना राबविण्यात येत आहे. नागरिकांनी घराबाहेर निघू नये, यासाठी पोलिस कठोर कारवाई करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 मे पर्यंत लोकडाऊन जाहीर केला आहे. शहरातील प्रमुख रस्तेही बंद केले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांच्या वेळाही ठरवून देण्यात आल्या आहेत. पण, गल्लीबोळातून पोलीस नसल्यावर नागरिक बाहेर येत असल्याचे चित्र सर्रासपणे पुणे शहरातील मध्यवर्ती भागात दिसून येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.