Pune : रुग्णालयातील रेस्टरूमध्ये गळफास घेऊन नर्सची आत्महत्या

एमपीसी न्यूज – रुग्णालयातील रेस्टरूमध्ये गळफास घेऊन एका २१ वर्षीय नर्सने आत्महत्या केली. ही घटना वाघोलीतील नवले रुग्णालयात शनिवारी घडली. प्रियंका कांबळे असे मयत नर्सचे नाव आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

मयत प्रियंका ही कल्लाळ (ता. उदगीर, जि. लातूर) येथील रहिवासी आहे. मागील काही दिवसांपासून ती या रुग्णालयात नर्सचे काम करत होती. शनिवारी रात्री तिने रुग्णालयाच्या रेस्टरूमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

आत्महत्येची माहिती मिळताच लोणीकंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिचा मृतदेह ससून रुग्णालयात पाठवला. प्रियंकाच्या मृतदेहाजवळ कोणतीही सुसाईड नोट आढळली नाही. तिने आत्महत्या का केली? याचा तपास पोलीस घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.