Pune Nwes : कोरोनाच्या संकट काळात पुणेकरांना मदत करा : चंद्रकांत पाटील

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर . पुण्यात अ‍ॅम्बुलन्सचा तुटवडा जाणवत असून,  इनोव्हा आणि इतर कार अ‍ॅम्बुलन्स तयार करण्यासही चंद्रकांत पाटील सांगितले

एमपीसी न्यूज – शहरात कोरोनाचे संकट वाढतच आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपच्या सर्व नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी पुणेकरांना मदत करावी, असे स्पष्ट आदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. तर, भाजप सरकारने दिलेल्या सुविधा मराठा समाजाला मिळाल्या पाहिजेत साधारण १५०० कोटी रुपयांच्या या सुविधा मिळत नाहीत. भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनामध्ये सहभागी व्हावे, असेही पाटील म्हणाले. 
चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक नुकतीच झाली. महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार मुक्ता टिळक, सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, उपमहापौर सरस्वती शेंडगे, शहर सरचिटणीस राजेश पांडे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, शहर सरचिटणीस दीपक पोटे, दीपक नागपुरे, रवी अनासपुरे, गणेश घोष आणि राजेश येनपुरे यावेळी उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ऑक्सिजन  खाटा वाढवा. पुणे महापालिकेतर्फे त्यासाठी प्रयत्न करावे. पुण्यात अ‍ॅम्बुलन्सचा तुटवडा जाणवत असून,  इनोव्हा आणि इतर कार अ‍ॅम्बुलन्स तयार करण्यासही चंद्रकांत पाटील सांगितले आहे. याचा खर्च भाजप करणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे कधीही फोन आले तरी त्याला नागरसेवकांनी प्रतिसाद द्यावा. गरजू नागरिकांना रुग्णालयाची बिले भरण्यास मदत करा, सरकारी दराप्रमाणे बिलांची आकारणी झाली की नाही, याची खातरजमा करून ही बिले भरावीत, अशा महत्वपूर्ण सूचनाही केल्या आहेत.
MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.