Pune : संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्याच्या निर्णयाचे स्वागत

एमपीसी न्यूज- राज्यातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये 26 जानेवारी पासून संविधानाच्या उद्देशिकेचे ( प्रीऍम्बल ) सामूहिक वाचन करण्यात येणार आहे. या निर्णयाचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी समितीचे अध्यक्ष नागेश भारत भोसले यांनी पत्रकाद्वारे स्वागत केले आहे.

‘सार्वभौमत्व संविधानाचे, जनहित सर्वांचे ‘ या उपक्रमांतर्गत हे वाचन केले जाईल. शालेय शिक्षण विभागाने या संबंधीचा आदेश काढला.
2007 पासून संविधान प्रेमी संघटना यासाठी आंदोलन करीत होत्या. 2008 ला पहिला आदेश निघाला. असाच आदेश आघाडी सरकारच्या काळात 4 फेब्रुवारी 2013 रोजी काढण्यात आलेला होता. पण त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली नाही. म्हणून संविधान प्रेमींनी सतत आंदोलने करून व राज्य शासनाला निवेदने देऊन शासनाच्या निदर्शनास आणून देत होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.