Pune : विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम स्थळाची अधिकाऱ्यांकडून पाहणी

एमपीसी न्यूज – कोरेगाव भीमा (पेरणे फाटा) येथे 1 जानेवारी रोजी (Pune ) विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी लाखो नागरिक अभिवादानासाठी एकत्र येतात. त्यांची गैरसोय होऊ नये तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने सर्व स्तरावर तयारी सुरु आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या निर्देशानुसार प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोरेगाव भीमा (पेरणे फाटा) विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम स्थळाची पाहणी केली, तसेच येथे करण्यात येत असलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेतला.

Talegaon Dabhade : नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीचा माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

यावेळी अपर पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा, उपविभागीय अधिकारी संजय आसवले, हवेली गट विकास अधिकारी भुषण जोशी आदी उपस्थित होते.

पेरणे फाटा येथे 1 जानेवारी रोजी विजयस्तंभास (Pune)अभिवादन करण्यास येणाऱ्या नागरिकांना सर्व सोयीसुविधा मिळतील यादृष्टीने पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह, विद्युत प्रकाश व्यवस्था, वाहनतळ, सुरक्षा व्यवस्था, आरोग्य सुविधा, गर्दीचे व वाहतुकीचे नियोजन याविषयी माहिती घेण्यात आली. या भेटीच्या वेळी विविध कार्यान्वयीन यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपास्थित होते.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.