Pune : कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाला 35 लाखांनी गंडवले

एमपीसी न्यूज- पुण्यातील नारायण पेठेतील एका ज्येष्ठ नागरिकाला कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने 35 लाखांनी फसवल्याचा प्रकार उघडकीस आला.

रामकृष्ण जोशी (वय 59) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी जोशी यांना जुलै 2014 मध्ये एक फोन आला होता. त्यामध्ये त्यांना बँकेतून कर्ज मिळवून देऊ असे सांगण्यात आले होते. त्यावर विश्वास ठेवून फिर्यादी यांनी बँक प्रोसिजरसाठी वेळोवेळी 34 लाख 93 हजार रुपये आरोपींनी सांगितलेल्या बँक खात्यावर भरले. परंतु कित्येक दिवस होऊनही कर्ज न मिळाल्याने जोशी यांनी अखेर पोलिसात तक्रार दिली. विश्रामबाग पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.