Pune : मंगळवार पेठेतील जुनाबाजार महिनाभर बंद

एमपीसी न्यूज- वाहतूक कोंडी होत असल्याने प्रायोगिक तत्वावर आजपासून (बुधवार) महिनाभर मंगळवार पेठेमध्ये जुना बाजार भरविता येणार नाही. या बाबतचे परिपत्रक पोलीस सह आयुक्त राजेंद्र शिसवे यांनी जारी केले आहे.

पुण्यात मंगळवार पेठेत रविवार आणि बुधवारी या दोन दिवशी शाहीर अमर शेख चौक ते कुंभार वेसपर्यंत जुना बाजार भरला जातो. या बाजारात साधारण 200 हून विक्रेते असतात. या बाजारात खरेदी करिता ग्राहक मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे रविवारी आणि बुधवारी या दोन दिवशी त्या परिसरातून जाताना वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.

या बाबत नागरिकांच्या पोलिसांकडे अनेक वेळा तक्रारी देखील प्राप्त झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुढील महिनाभर या रस्त्यावर जुना बाजार भरविता येणार नाही अशा स्वरुपाचे परिपत्रक जारी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.