Pune : ओएलएक्सवरील ग्राहकाने टेस्ट ड्राइव्हच्या बहाण्याने नेलेली दुचाकी केली लंपास

एमपीसी न्यूज – ओएलएक्स वर दुचाकीची जाहिरात पाहून ती विकत घेण्यासाठी आलेल्या इसमाने टेस्ट ड्राइव्हच्या बहाण्याने दुचाकी घेऊन पसार झाल्याची घटना सोमवारी (दि.10) सायंकाळी साडेसातच्या दरम्यान कात्रज चौकातील आयसीआयसीआय बँकेजवळ घडली.

याप्रकरणी सुबेंदु पाल (वय 24, रा. शिवाजीनगर गावठाण) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पाल यांनी त्यांची दुचाकी विकण्यासाठी ओएलएक्स वेबसाइटवर जाहिरात दिली होती. ती जाहिरात पाहून एका इसमाने पाल यांच्याशी ओएलएक्सवर संपर्क करून पाल यांच्याशी चॅटिंग केली. आणि त्यानंतर त्या इसमाने फिर्यादी पाल यांना त्यांची दुचाकी पाहण्यासाठी कात्रज चौकात बोलावून घेतले. पाल देखील आपली दुचाकी घेऊन कात्रज चौकातील आयसीआयसीआय बँकेजवळ गेले.

दरम्यान तिथे आलेल्या इसमाने पाल यांना मोटारसायकल चालवून पाहतो आणि लगेच आणतो असे सांगून दुचाकी घेऊन पसार झाला. याप्रकरणी अज्ञात इसमाच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.