Pune : मुख्यमंत्री शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त 60 किलोचा मोदक श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशास अर्पण

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Pune) यांच्या वाढदिवसानिमित्त विधानपरिषदच्या उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यावतीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश मंदिर येथे 60 किलो वजनाचा मोदक अर्पण करण्यात आला. शिवसेना पुणे शहर व जिल्ह्याच्या वतीने नीलम गोर्हे यांच्या व अन्य पदाधिकारी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.

या प्रसंगी शिवसेना नेत्या व विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम  गोऱ्हे यांच्या समवेत शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद भानगिरे, जिल्हा प्रमुख रमेश कोंडे, शिवसेना कामगार सेना अध्यक्ष सुधीर कुरुमकर, शिवसेना महिला आघाडीच्या पूजा रावेतकर, सुदर्शना त्रिगुणाईत आदी मान्यवरांच्या बरोबरच शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

या नंतर डॉ.नीलम गोऱ्हे , प्रमोद भानगिरे, रमेश कोंडे व पदाधिकारी यांनी दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात दर्शन घेवून महाआरती केली. या प्रसंगी प्रसार माध्यमांशी बोलतांना डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या, महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यसम्राट मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.

Alandi Fire News : आळंदी येथे लागलेल्या आगीने आजूबाजूच्या गावांचे झाले नुकसान; चारा, वाहने आणि प्राण्यांना इजा

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशास महाआरती करून आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांच्या मध्ये शिवसेना भाजप राष्ट्रवादी आघाडीस यश मिळावे, त्यांचे जास्तीत जास्त (Pune) खासदार, आमदार निवडून यावेत व पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केंद्रात तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राज्यात सरकार स्थापन होवो अशी प्रार्थना केल्याचे सांगितले.

तसेच येथे केलेल्या बहुसंख्य प्रार्थनां परमेश्वराचे आशीर्वादाने सफल केल्याचे त्यांनी नमूद केले. या महाआरतीच्या वेळी मिळालेले श्रीफल 9 फेब्रुवारी या तारखेस वाढदिवसाच्या दिवशी एकनाथ शिंदे यांना अर्पण करण्यात येणार आहे.

https://www.youtube.com/watch?v=x_6bVP8etdA

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.