Pune : दीड कोटीच्या ‘ब्राऊन शुगर’सह दाम्पत्य अटकेत; पुणे पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज -संशयावरुन तपासणी घेतलेल्या जोडपाच्या सॅकमधून सुमारे 1 कोटी साठ लाख रुपये किमतीचे तब्बल दीड किलो ‘ब्राऊन शुगर’ जप्त करण्यात आले..ही कारवाई आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास बावधन परिसरातील चांदणी चौकात करण्यात आली. सेलवम नरेशन देवेंदर (वय 57) आणि वासंती चिनू देवेंदर (वय 57) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कोथरूड पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्त घालत असताना त्यांना चांदणी चौकाजवळ संशयास्पद अवस्थेत उभे असताना दिसले. पोलिसांनी त्यांना हटकले असता त्यांनी निघून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्या सॅकमध्ये सुमारे 1 किलो 540 ग्राम ‘ब्राऊन शुगर’ सापडले. याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत सुमारे 1 कोटी 60 लाख रुपये इतकी आहे.

आरोपी सायन कोळीवाडा येथील रहिवाशी आहेत. त्यांनी हे अंमली पदार्थ कोठून आणले, कोणाला देणार होते..याबाबत तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.