Pune: बनावट सोने तारण ठेवून फायनान्स कंपनीची फसवणूक, एकाला अटक

Pune: One arrested for defrauding finance company by pledging fake gold आरोपीवर यापूर्वीही फसवणूक केल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल आहेत. अहमदनगर येथे बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज घेतल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे.

एमपीसी न्यूज- मनिपूरम गोल्ड लोन या फायनान्स कंपनीत बनावट सोने तारण ठेवून कर्ज घेत फसवणूक केल्याप्रकरणी एकाला वारजे पोलिसांनी अटक केली आहे. नीलेश शांताराम सुर्वे (वय 40)असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याप्रकरणी संकेत संने यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे माळवाडीत मनिपूरम गोल्ड लोन या फायनान्स कंपनीची एक शाखा आहे. याठिकाणी आरोपीने 16 जून रोजी बनावट सोने तारण ठेवत तीन लाख 15 हजार रुपयाचे कर्ज घेतले होते. यावेळी त्यांनी स्वतःचे नाव देखील खोटे सांगितले होते.

दरम्यान, फायनान्स कंपनीकडून करण्यात आलेल्या ऑडिटमध्ये आरोपीने तारण ठेवलेले सोने बनावट असल्याचे लक्षात आले. त्यानंतर आरोपी पुन्हा एकदा या फायनान्स कंपनीत आला असता कंपनीकडून पोलिसांना याची माहिती दिली. वारजे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेत चौकशीअंती त्याला अटक केली.

आरोपीवर यापूर्वीही फसवणूक केल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल आहेत. अहमदनगर येथे बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज घेतल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे.

दरम्यान, वारजे पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर कोर्टात हजर केले असता सात जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.