Pune : तरुणीला इमारतीवरून ढकलून तिचा खून केल्याप्रकरणी एकजण अटकेत

एमपीसी न्यूज – लिफ्ट दिल्यानंतर अश्लील चाळे करून तरूणीने तरुणाकडे पैशाची मागणी केली. त्यामुळे त्याने इमारतीवरून ढकलून देऊन तिचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार येरवडा परिसरात समोर आला आहे. कोरेगाव पार्क परिसरात ही घटना घडल्यानंतर त्याने तिचा मृतदेह होळकर ब्रिजखाली टाकून पळून गेला होता.

आश्रफ सय्यद (वय २०) असे आरोपीचे नाव असून त्याला गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तो कोरेगाव पार्क पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.