Pune: पुण्यातील एका व्यापाऱ्याच्या हत्येप्रकरणी एकाला अटक; संशयित आरोपीला सुनावली पोलीस कोठडी

एमपीसी न्यूज – तीन दिवसांपूर्वी पुण्यातील एका व्यापाऱ्याची साताऱ्यात गोळी घालून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी या हत्येप्रकरणी एकाला अटक केली आहे.

आफ्रिदी रौफ़ खान (23, नाना पेठ) असे अटक आरोपीचे नाव आहे. सातारा पोलिसांच्या मदतीने पुणे पोलिसांनी त्याला आज दुपारी अटक केली आहे.

आरोपीचा या गुन्ह्यातील सहभाग निश्चित झाला असून अजूनही काही आरोपींची नावे यामध्ये समोर आली आहेत. सुरवातीला खंडणीसाठी अपहरण करून हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. परंतु यामागे हेच कारण आहे का? याचा तपासही पोलीस करीत आहेत. आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे, असे सूत्रांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.