BNR-HDR-TOP-Mobile

Pune : पुलवामा हल्ल्याप्रकरणी पुण्यातून एकाला अटक; बिहार एटीएसची चाकणमध्ये कारवाई

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – पुलवामा हल्ल्यानंतर जवानांशी संबंधित महत्वाची माहिती जवळ बाळगणाऱ्या संशयित दहशतवाद्याच्या साथीदाराला चाकण परिसरातून बिहार एटीएसने आज अटक केले. शरियत मंडल (वय १९) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

तीन दिवसांपूर्वी बिहार येथून एटीएसच्या पथकाने खैरूल मंडल आणि अबू सुलतान या दोन बांगलादेशींना अटक केली होती. त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत शरियत याचे नाव पुढे आले. त्यानंतर बिहार एटीसने पुणे एटीएसच्या मदतीने चाकण पट्ट्यात छापा मारून शरीयत याला अटक केली. त्याला आज पुणे कोर्टात हजर करण्यात आले होते.

HB_POST_END_FTR-A4

.