Pune : अंमली पदार्थ विक्री प्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज-अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एकास गुन्हे शाखेने (Pune) पकडले.हा प्रकार सदाशिव पेठ येथे घडला .त्याच्याकडून पाच लाख 19 हजारांचे चरस, तलवार, कुऱ्हाड, चाकू अशी तीक्ष्ण शस्त्रे जप्त करण्यात आली.

सागर सुभाष मोडक (वय 43, रा. ऑर्चिड बिल्डींग, नातूबाग, 1367, सदाशिव पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

सदाशिव पेठेतील नातूबाग परिसरात एक जण चरसची विक्री करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट एकमधील पोलीस कर्मचारी अनिकेत बाबर यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून मोडकला पकडले. पोलिसांनी त्याची चौकशी केली. तेव्हा त्याच्याकडे तीक्ष्ण शस्त्रे असल्याचे उघडकीस आले. मोडक याच्याकडून पाच लाख 19 हजार रुपयांचे 352 ग्रॅम चरस, तीन तलवारी, दोन कुकरी, एक सत्तूर, एक कुऱ्हाड, एक रापी असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.

Mahalunge : बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्या प्रकरणी तिघांना अटक

मोडकच्या विरुद्ध खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, सहायक निरीक्षक आशिष कवठेकर, उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी, अजय जाधव, अनिकेत बाबर, राहुल मखरे, शशिकांत दरेकर, दत्ता सोनवणे, विठ्ठल साळुंके, तुषार माळवदकर, रुक्साना नदाफ आदींनी ही कारवाई (Pune) केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.