Pune : महिलांना अश्लील मेसेज पाठवणारा 84 वर्षीय पुजारी गजाआड

एमपीसी न्यूज- महिलांना अश्लील मेसेज पाठवून त्रास देणाऱ्या एका उच्च शिक्षित 84 वर्षीय पुजाऱ्याला स्वारगेट पोलिसांनी अटक केली. गेल्या काही महिन्यांपासून महाराज महिलांना अश्लील मेसेज पाठवून त्रास देत होता.

बाबा हरिदास महाराज उर्फ शरद बाळकृष्ण पत्की असे आरोपी पुजाऱ्याचे नाव आहे. हा पुजारी उच्चशिक्षित असून इलेक्ट्रिक इंजिनिअर आहे. माण तालुक्यातील शेणवाडी गावातील एका मंदिरातून पुजाऱ्याला अटक करण्यात आली. गेल्या काही महिन्यांपासून हा पुजारी महिलांना अश्लील मेसेज पाठवून त्रास देत होता.

या पुजाऱ्याने कोणा महिलेला फसवले असल्यास किंवा या विषयी कोणाला माहिती असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन स्वारगेट पोलिसांनी केले आहे.

याबाबत माहिती देताना सहाय्यक पोलीस आयुक्त सर्जेराव पवार यांनी सांगितले की, स्वारगेट पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये सदर पुजारी हा फिर्यादी महिलेच्या सासूला अश्लील मेसेज पाठवून त्रास देत असे. या गुन्ह्याचा तपास करीत असताना ज्या नंबरवरून असे मेसेज पाठवले जात होते तो नंबर नंबर या पुजाऱ्याच्या एका शिष्याकडून मिळाला होता. हा पुजारी उच्चशिक्षित असून प्रभावी व्यक्तिमत्वामुळे लोक त्यांच्यावर विश्वास ठेवत असत. या गुन्ह्याचा तपास करत असताना संबंधित पुजारी सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील शेलवाडी येथे राहत असल्याची माहिती मिळाली. या ठिकाणच्या सरपंचानी देखील ग्रामपंचायत मध्ये ठराव पास करून या पुजाऱ्याला गाव सोडण्याचे आदेश दिले होते. गाव सोडण्यापूर्वीच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.