Pune: येरवड्यातील सराईत गुंड पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातून दोन वर्षांसाठी तडीपार

Pune: one criminal deported from Pune and Pimpri-Chinchwad for two years लियाकत सय्यद हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर तीन गुन्ह्यांची नोंद आहे. यातील दोन गुन्ह्यात तो कारागृहातही गेला होता.

एमपीसी न्यूज- येरवड्यातील एका सराईत गुन्हेगाराला पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातून परिमंडळ 4 चे पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांनी दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. लियाकत बिलाल सय्यद (वय 28) असे या तडीपार केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.

लियाकत सय्यद हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर तीन गुन्ह्यांची नोंद आहे. यातील दोन गुन्ह्यात तो कारागृहातही गेला होता. दरम्यान लियाकत सय्यद त्याने आपल्या वर्तणुकीतून येरवडा परिसरातील शांततेचा भंग केल्याचे निदर्शनात आले होते.

त्यामुळे त्याला पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीतून तडीपार करण्याचा प्रस्ताव येरवडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक युनूस शेख यांनी मांडला होता.

पोलीस निरीक्षकांच्या या प्रस्तावाची पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी दखल घेत लियाकत सय्यदला दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचे आदेश दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.