Pune : महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना एक कोटींचे विमा कवच; वारसांना महापालिकेत सामावून घेणार -आयुक्तांचे आदेश

एमपीसी न्यूज – ‘कोरोना’विरुद्ध लढताना महापालिका अधिकारी- कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास वारसांना एक कोटींचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे, असा आदेश महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी बुधवारी दिला.

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी कर्मचाऱ्यांना सुरक्षा कवच देण्याची मागणी आयुक्तांकडे केली होती. त्याला इतर राजकीय पक्षांचाही पाठिंबा होता. एक कोटीचे विमा संरक्षण व्यतिरिक्त महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वारसांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेणार असल्याचेही आदेशात म्हटले आहे.

महापालिकेतील अधिकारी, आरोग्य विभागाकडील वैद्यकीय अधिकारी, नर्सेस, सेवक, सुरक्षारक्षक, सफाई कर्मचारी, लेखनिकी, शिक्षक यांना ही योजना लागू होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like