Pune : भारतीय बौध्द महासभेच्या वतीने एक दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर उत्साहात

एमपीसी न्यूज – भारतीय बौध्द महासभेच्या वतीने एक दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर मातोश्री रमाबाई आंबेडकर रोड येथील मिलिंद बुध्द विहार येथे उत्साहात पार पडले. या शिबिराचे अध्यक्ष पद भारतीय बौध्द महासभेचे पुणे अध्यक्ष के. बी. मोटघरे यांनी स्वीकारून कार्यक्रमास सुरुवात झाली.

यावेळी भारतीय बौध्द महासभेचे पुणे सरचिटणीस जयसिंगराव कांबळे, कोषाध्यक्ष यु. एन. जाधव, कॅशियर बी. आर. थोरात, सेक्रेटरी प्रा. राजकुमार गायकवाड, सेक्रेटरी डी. एन. धाईंजे व कार्याध्यक्ष बाळासाहेब भिसे आदींनी नवबौद्धाचार्य मार्गदर्शन केले . यावेळी डॉ सुरेश कंठाणे उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी नवबौद्धाचार्य दत्ता नागटिळक, विष्णू कांबळे,विमल ढवळे, जितेंद्र घाईजे,अशोक अवचरे,आर के लोंढे,जितेंद्र गायकवाड,उपेक्षा वनशीव , रामदास सोनवणे, राजेंद्र शेलार, रंजना दामले, नंदकिशोर ननावरे, अमित कांबळे, विष्णू काकडे, अविनाश जगताप, अशोक गायकवाड, रमेश जमदाडे, प्रिती पिल्ले, प्रविण डोळस,एकनाथ जाधव,विमल दवणे, रतन कुमार आदींनी आपली मनोगते व्यक्त केली .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय बौध्द महासभेचे पुणे सरचिटणीस जयसिंग कांबळे यांनी केले. तर, आभार जितेंद्र गायकवाड यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.