Pune News : बीडच्या शौर्यची एक दिवसीय सामन्यात 250 धावांची तुफान खेळी

एमपीसी न्यूज –  पुणे येथे चालू असलेल्या 13 वर्षीय मुलांच्या एकदिवसीय क्रीकेट सामन्यात बीडच्या 11 वर्षीय शौर्य जाधवने मोठ्या मुलांच्या वयोगटात खेळताना यंगस्टार (Pune News) संघाकडून प्रथम फलंदाजी करत वैयक्तीक 250 धावांची तुफानी खेळी केली. त्याच्या जोरावर संघाने 510 धावा केल्या.

आजपर्यंत शौर्यने 172 सामने खेळले असून 5 हजार 357 धावा केल्या आहेत.  ज्यात 8 शतके तर 35 अर्धशतकांचा समावेश आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व क्रीकेटप्रेमी त्याला शुभेच्छा देत आहेत.

Dehugaon News : मुलांना घडवताना माणुसकीची मूल्ये रुजवत वेदनेशी नात जोडा – डॉ. गिरीश कुलकर्णी

शौर्यला फलंदाजीमध्ये कृष्णा गायकवाड, पृथ्वी पाळणे, रुद्राक्ष जाधव यांनी चांगली साथ दिली. शौर्यचा त्याच्या आत्तापर्यंतच्या संपूर्ण खेळीतील ही उत्कृष्ट व तडाखेबाज खेळी होती.(Pune News) तसेच चालू असलेल्या व्हेरॉक कप मधील पहिल्या सामन्यातच शौर्यने ओम साई क्रिकेट संघाकडून खेळताना नाबाद 118 धावा करत पुणेकरांची मने जिंकली.

या शतकीय खेळी बद्दल बीड जिल्हा क्रीकेट असोसिएशनचे सचिव आमेर सलीम, त्यांचे कोच अजहर सर, संजय धस, मनोज जोगदंड, गुप्ता सर, हाडके सर, डॉ प्रवीण माने, सचीन गायकवाड, बीड जिल्हा क्रीकेट वकीलसंघ यांनी त्यांस शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.