BNR-HDR-TOP-Mobile

Ozar : दहशतवाद विरोधी पथकाकडून 15 तलवारीसह एक सराईत गुन्हेगार ताब्यात

एमपीसी न्यूज- पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथक आणि ओतूर पोलीस ठाण्याने केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये 15 तलवारी घेऊन दुचाकीवरून निघालेल्या एका सराईत गुन्हेगाराला सोमवारी ओझर येथे ताब्यात घेण्यात आले.

सोमनाथ राजाराम साळुंके (वय 26) असे या आरोपीचे नाव आहे.

सोमनाथ साळुंके याच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल असुन तो कारखाना फाट्यावरून ओतूरच्या दिशेने दुचाकीवर पांढर्‍या गोणीमध्ये 15 तलवारी बांधून निघाला आहे अशी माहिती पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीवरून ओतूर पोलिसांची मदत घेऊन साळुंखे याला ओझर येथे ताब्यात घेण्यात आले.

सदर कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा पद्माकर घनवट, सहाय्यक पोलीस निरीक्षक ओतूर पोलीस स्टेशन रमेश खुणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, सहायक फौजदार विश्वास खरात, सुनील ढगारे,राजु पवार,किरण कुसाळकर, मोसिन शेख या पथकाने केली.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3