Pune : बेगडेवाडी येथे लोकलच्या धडकेत एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – बेगडेवाडी येथे रेल्वे रुळ ओलांडत असताना (Pune) एका 40 वर्षीय इसमाचा लोकल गाडीची धडक लागून मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी (दि.26) रात्री सव्वा आठच्या सुमारास घडली आहे.

मयताची ओळख अद्याप पटली नाही. रेल्वे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून त्यांनी दिलेल्या वर्णणानुसार, अनोळखी पुरुष वय अंदाजे 40 वर्ष, शरीर बांधा मध्यम उंची अंदाजे 5 फूट 2 इंच, रंग काळा सावळा नाक बसके हाता पायावर जळालेले जुने व्रण, अंगात पांढ-या रंगाचा फुल भायांचा शर्ट, त्यावर निळ्या रंगाचे ठीपके, नेसनीस खाकी रंगाची कॉटन फुल पॅन्ट, पायात काळ्या रंगाची सॅन्डल असे मयतचे वर्णन आहे.

Pune : भाजप नेते गणेश बिडकर यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल

मयत इसमाबाबत काही माहिती मिळाल्यास देहुरोड लोहमार्ग रेल्वे पोलीस (Pune) उपनिरीक्षक पी.टी.करदाळे यांना 965701973 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.