Pune : फाटक्या नोटा बदलून देण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाची एक लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – फाटक्या नोटा बदलून देण्याच्या बहाण्याने फाटक्या नोटा आणि त्याबदल्यात एक लाख रुपये घेतले. मात्र, प्रत्यक्षात व्यावसायिकाला नोटा बदलून अथवा दिलेले पैसे काहीही परत दिले नाही. ही घटना दळवी हॉस्पिटल समोरील इराणी गल्लीकडे जाणा-या रोडवर शिवाजीनगर येथे गुरुवारी (दि. 23) दुपारी घडली.

याप्रकरणी पिंपरी कॉलनी येथे राहणा-या एका 24 वर्षीय व्यावसायिकाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात इसम आणि महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

_MPC_DIR_MPU_II
  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे दुकान आहे. त्यांच्याकडे 2 लाख 5 हजार रुपयांचा फाटक्या नोटा आहेत. त्या नोटा त्यांना बदलून हव्या होत्या. आरोपी व्यक्ती आणि महिला हे भाऊ-बहिणीचे नाटक करून फिर्यादीकडे आल्या. त्यांनी फिर्यादी यांना नोटा बदलून देण्याचा बहाणा केला. मात्र, नोटा बदलून देण्यासाठी त्यांनी एक लाख रुपयांची मागणी केली.

फिर्यादी यांनी ती मागणी मान्य केली आणि नोटा बदलून देण्यापूर्वी आरोपींना एक लाख रुपये दिले. मात्र, आरोपींनी घेतलेले एक लाख रुपये अथवा फाटक्या नोटा काहीही न देता फसवणूक केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजीनगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.