Pune: शहरात आणखी दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू, एकूण दहा बळी, एका संशयितांचाही मृत्यू

एमपीसी न्यूज – रविवार पेठेतील एका 44 वर्षीय कोरोना रुग्णाचा आज (बुधवारी) महापालिकेच्या डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात मृत्यू झाला तसेच तसेच ससून सर्वोपचार रुग्णालयात काल (मंगळवारी) मरण पावलेल्या संशयिताचा कोरोना निदान चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे पुणे शहरातील कोरोना बळींची संख्या दोनने वाढून 10 झाली आहे. या व्यतिरिक्त ससून सर्वोपचार रुग्णालयात आणखी एका संशयित रुग्णांचाही मृत्यू झाला आहे. त्याच्या कोरोना निदान चाचणीचा अहवाल अजून प्राप्त झालेले नाहीत. 
पुणे महापालिकेच्या डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात प्रथमच एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत या रुग्णालयात 150 रुग्ण आहेत. डॉ. नायडू हॉस्पिटलमध्ये रुग्णांची क्षमता संपली आहे. त्यामुळे महापालिकेच्या बोपोडी येथील रुग्णालयात रुग्ण हलविले जात आहेत.
आतापर्यंत शहरात मरण पावलेल्या कोरोनाबाधितांना श्वसनाचा त्रास, उच्च रक्तदाब, किडनी अथवा मधुमेहाचा त्रास असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे हे आजार असलेल्या रुग्णांनी कोरोनापासून स्वतः वाचविण्यासाठी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.