Pune : शहरात आणखी एक कोरोना ‘पॉझिटीव्ह’ रुग्ण, कोरोनाबाधितांची संख्या 18 वर!

एमपीसी न्यूज – पुणे शहरात आणखी एका 28 वर्षीय महिलेला रुग्णाच्या कोरोना निदान चाचणीचा अहवाल ‘पॉझिटीव्ह’ आला आहे. त्यामुळे आता शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 18 झाली आहे. ही महिला रुग्ण नेदरलँड आणि फ्रान्समध्ये जाऊन आला होती, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 42 वर जाऊन पोचली आहे.

पिंपरी-चिंचवड व पुण्यात मिळून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 18 झाली आहे. पिंपरी-चिंचवडमधील एका संशयित रुग्णांच्या कोरोना निदान चाचणीचा अहवाल काल पॉझिटीव्ह आला होता. त्यानंतर पुण्यातही एक रुग्णाची भर पडल्याने दोन्ही शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या आता आठ तर पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांची संख्या आता दहा झाली आहे. सर्व कोरोनाबाधित रुग्णांवर महापालिकांच्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

संबंधित आणखी बातम्या वाचा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.