Pune : आणखी एका नगरसेवकाची फाॅर्च्युनर गाडी चोरीला

एमपीसी न्यूज- पुण्यात फाॅर्च्युनरसारख्या आलिशान गाड्या चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या दोन दिवसांत शहरातून तीन फाॅर्च्युनर गाड्या चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे सध्या पुण्यातील फाॅर्च्युनर असलेल्या नगरसेवकांच्या पोटात गोळा आला आहे.

पुणे महापालिकेतील नगरसेवक रवींद्र धंगेकर यांची फॉर्च्युनर गाडी मंगळवारी (दि. 30) पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरटयांनी चोरून नेली. गाडी चोरतानाचा हा सर्व प्रकार सीसीटिव्हीमध्ये कैद झाला आहे. 17 मिनिटांत चोरट्यांनी फॉर्च्युनरचे लॉक उघडून गाडी चोरून नेली.

धंगेकर राहत असलेल्या तोफखाना येथील त्यांच्या घरासमोरून ही कार चोरीला गेली आहे. चोरट्यानी कसबा पेठेततून राजवर्धन शितोळे यांची फॉर्च्युनर गाडी चोरली. त्यानंतर त्याच कारने धंगेकर यांच्या घराजवळ येऊन बाहेर उभी असलेली कार चोरून नेली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.