Pune: भांडारकर रस्त्यावर मध्यरात्री बंगल्याला लागलेल्या आगीत होरपळून एकजण मृत्युमुखी

एमपीसी न्यूज – पुण्यातील भांडारकर रस्त्यावरील राजश्री सोसायटी येथील एका दुमजली घराला काल (मंगळवारी)  लागलेल्या आगीत  होरपळून एक जण गंभीररीत्या जखमी झाला. उपचारादरम्यान आज सकाळी त्या व्यक्तीचा मृत्यू झाला.

संदीप विनायक गोखले (वय 46) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. आगीत संपूर्ण घर जळून बेचिराख झाले.

_MPC_DIR_MPU_II

अग्निशमन दलाचे प्रभारी अधिकारी सुनील नाईकनवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री 2 वाजून 52 मिनिटांनी भांडारकर रस्त्यावरील एका सोसायटीतील घराला आग लागल्याची वर्दी आली होती. त्यानुसार अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेईपर्यंत संपूर्ण घर आगीत बेचिराख झाले होते. घरात संदीप गोखले एकटेच राहत असून ते पहिल्या मजल्यावर झोपले होते. अग्निशमन दलाच्या जवानांना ते गादीवर गंभीररीत्या भाजलेल्या अवस्थेत आढळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जखमी अवस्थेतील संदीप गोखले यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.