Pune : बालिकेवरील अत्याचार प्रकरणी एक संशयित ताब्यात

एमपीसी न्यूज- पुणे स्टेशन परिसरातील फुटपाथवर आईसोबत झोपलेल्या अडीच वर्षाच्या मुलीला मंगळवारी (दि. २७) पहाटे उचलून नेत तिच्यावर रेल्वेच्या डब्यामध्ये नेऊन बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. अशी माहिती पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांनी दिली आहे.

पुणे पोलिसांनी घटनास्थळा जवळील cctv फुटेजची पाहणी केली असता या फुटेजमध्ये साधारण वीस ते पंचवीस वर्षांचा युवक पीडितेला खांद्यावर घेऊन जाताना दिसत आहे. मात्र याबाबत अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी गुन्हे शाखेचे वेगवेगळी पथके तैनात करण्यात आली आहेत अशी माहिती सरदेशपांडे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.