Pune : एकतर्फी प्रेमातून भर रस्त्यात चाकूचा धाक दाखवून तरुणीला जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज- ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे. मित्राबरोबर फिरताना दिसलीस तर खल्लास करेन’ एका तरुणाने भर रस्त्यात चाकूचा धाक दाखवत एका तरुणीला अशी धमकी दिल्याचा प्रकार सारस बागेजवळ पाटील प्लाझा समोर घडला. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित तरुणाला अटक केली आहे.

सचिन माने असे या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी 19 वर्षाच्या तरुणीने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. धमकी देणारा तरुण आणि संबंधित तरुणी एकाच परिसरात राहतात. घटना घडली त्या दिवशी आरोपी तरुणाने संबंधित तरुणीसमोर गाडी आडवी घालत चाकूचा धाक दाखवला. ‘ तू मला खूप आवडतेस. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तू फक्त माझी आहेस. तू तुझ्या मित्रापासून दूर राहा नाहीतर दोघांनाही खल्लास करेन अशी धमकी दिली.

स्वारगेट पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक त्र्यंबके तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.