Pune: रेल्वे तिकिटांचे आजपासून ऑनलाईन बुकिंग, गाडीच्या वेळेपूर्वी दीड तास आधी स्टेशनवर प्रवाशाची हजेरी बंधनकारक

Pune: Online booking of train tickets from today, passengers are required to report at the station 1.5 hours in advance. एक जूनपासून मुंबईतून 50 तर पुण्यातून एक रेल्वेगाडी सुरू होणार

एमपीसी न्यूज – भारतीय रेल्वे एक जूनपासून सुरू करीत असलेल्या 200 स्पेशल गाड्यांची यादी व वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून या रेल्वेगाड्यांच्या तिकिटाचे ऑनलाईन बुकिंग आज (गुरूवार) सकाळी दहा वाजल्यानंतर सुरू होणार आहे. यामधील 50 रेल्वेगाड्या मुंबईहून सुटणाऱ्या आणि मुंबईकडे येणाऱ्या असणार आहेत. पुणे स्थानकावरून सुटणारी आणि पुणे स्थानकापर्यंत येणारी पुणे-दानापूर ही एकमेव रेल्वेगाडी असणार आहे. या रेल्वेगाड्यांच्या प्रवाशांनी गाडीच्या वेळेपूर्वी दीड तास आधी रेल्वेस्थानकावर पोहचणे बंधनकारक करण्यात आले आहे. 

पहिल्या टप्प्यात फक्त नॉन एसी रेल्वे गाड्या धावणार आहेत, असे रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी जाहीर केले होते, मात्र आता एसी आणि जनरल बोगीही असणार आहेत. तिकिटाचे बुकिंग फक्त IRCTC च्या वेबसाइट आणि अ‍ॅपवरून होणार आहे. रेल्वेने जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार या ट्रेनमध्ये आरएसी आणि वेटिंग तिकिटे दिली जातील, मात्र वेटिंग तिकटधारकांना रेल्वेगाड्यांमध्ये जाणाची परवानगी नाही.

या स्पशेल 200 ट्रेनने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना रेल्वे निघण्यापूर्वी 90 मिनिटे आधी रेल्वेस्थानकावर येणे बंधनकारक आहे. त्याशिवाय सर्व प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करून प्रवाशाला करोनाची लक्षणं आहेत का, याची तपासणी होणार आहे. करोनाची कोणतीही लक्षणे नाहीत अशाच प्रवाशांना रेल्वेगाडीत प्रवेश दिला जाणार आहे. चादर, ब्लॅंकेट आणि पडदे दिले जाणार नाहीत. प्रवाशांनी घरातून निघताना आपापले आवश्यक सामान घेऊन निघावे. तसेच प्रत्येक प्रवाशाने आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करणे बंधनकारक आहे. त्यासोबत मास्कही बंधनकारक करण्यात आला आहे.

या गाड्या या श्रमिक ट्रेन्स व्यतिरिक्त आहेत. श्रमिक ट्रेन मोठ्या प्रमाणावर धावणार आहेत. यासाठी अनेक नवे नियम करण्यात आले आहेत.रेल्वे स्टेशनवरची हॉटेल्स, फूड स्टॉल्स, बुक स्टॉल्स उघडण्याचा निर्णय रेल्वेने जाहीर केला आहे. ही दुकाने उघडण्यासाठी कार्यवाही सुरू करा, असे आदेश रेल्वे विभागाने संबंधित यंत्रणांना दिले आहेत. पण हे करताना काही काळजी घेण्यासही सांगितलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा सर्व व्यवहार सुरळीत करण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.